
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
मुंबई : राजेंद्र राऊत यांचे मनापासून अभिनंदन आहे. भुयारी गटारीची योजना ही पूर्ण करणे अत्यंत महत्वाचं असते. पण ते तुम्ही पूर्ण करून दिली. मध्यंतरी काम अडवले होते, पण तुम्ही ते पूर्ण करून दाखवलं.
बार्शी हे शहर हे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा जोडणारं शहर आहे. त्यामुळे शिक्षण, बाजारपेठ सगळ्यावर अनेक आसपासचे लोक अवलंबून आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकसंख्या आहेत तसेच फ्लॉटिंग लोकसंख्या देखील आहे. कोरोनाच्या काळात आसपासचे रुग्ण बार्शीत येतं होते. शिक्षणासाठी असलेली सोय पाहता अनेक विद्यार्थी येथे येतात. त्यामुळे हे शहर आणि तालुका चांगला झाला पाहिजे. त्यासाठी मी प्रत्येक मदत करण्यासाठी तयार आहे. राजाभाऊ राऊतांसाठी आम्ही बेरर चेक सारखे आहे. त्यांनी केलेली मागणी पूर्ण होते म्हणजे होतेच, असे म्हणत फडणवीस यांच्याकडून राजेंद्र राऊत यांचं कौतुक करण्यात आले. दरम्यान, राजेद्र राऊत यांनी भाषणाच्या सुरुवातीस देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री म्हणून केला.