
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे – मातंग एकता आंदोलन” या राज्यव्यापी संघटनेच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी बावडा येथील सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासु आणि कार्यक्षम नैतृत्व श्री.शरदराव गायकवाड तर युवक तालुका अध्यक्ष पदी सोनुभाऊ ढावरे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी महिला आघाडी पुणे जिल्हा प्रभारी अध्यक्ष:-
सौ. संगीता ताई दादाराव लांडगे-बारामती, इंदापूर -दौंड-बारामती संपर्क प्रमुख पदी उद्योगपती राजु गाडे-पाटील व इंदापूर तालुका युवक संपर्क प्रमुख पदी अमित मोरे , इंदापूर शहर संपर्कप्रमुख पदी तुषार ढावरे, अनिकेत सानप यांची युवक शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.
शुक्रवार- दिनांक ५/११/२०२२ पुणे या ठिकाणी मातंग एकता आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी गृहराज्यमंत्री रमेश दादा बागवे व राज्य कार्याध्यक्ष नगरसेवक अविनाश बागवे , प्रदेश समन्वयक विठ्ठल थोरात, प्रदेश सचिव अरुणजी गायकवाड , प्रदेश सरचिटणीस भगवान मोरे सर, महाराष्ट्र सचिव दिलीप नाना सोनवणे, पश्चिम महाराष्ट्र युवक अध्यक्ष किरण भाऊ लोंढे, जिल्हाध्यक्ष राजु मांढरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष ललेंद्र शिंदे व तालुक्यातील संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
मातंग एकदा आंदोलन संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून देवुन समाजात शैक्षणिक व व्यावसायिक गोष्टींवर लक्ष द्यावे. तसेच शासनाच्या विविध योजना, शिष्यवृत्ती, वैद्यकीय, MPSC व UPSC मध्ये मातंग समाजाची मुलं कशी चमकतील यासाठी प्रयत्न करावे संघटना पूर्ण ताकदीनिशी आपल्या सोबत राहील अशी ग्वाही माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे साहेब यांनी दिली.