
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर : – आज नांदेड येथे मा गिरीशजी महाजन साहेब ( पालकमंत्री नांदेड जिल्हा ) आले असता देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात 50 खाटा साठी बांधकाम निधी व स्त्री रुग्णालयास मान्यता आणि स्वतंत्र रक्त तपासणी केंद्र ,सिटी स्कॅन सेवा उपलब्ध करून द्यावी असे निवेदन नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशजी महाजन साहेब यांना देण्यात आले या वेळी मा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ,जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर साहेब मा गंगाधरराव जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली देताना ,तीन राज्याच्या सीमेवरील देगलूर शहर असून रुग्णाची संख्या दिवसेन दिवस वाढत आहेत उपजिल्हा रुग्णालयास 100 खाटाची मंजुरी असून उर्वरित 50 खाटाचे बांधकाम निधी लवकर उपलब्ध करून खाटाची संख्या वाढवावी ,स्त्रियांसाठी स्त्री रुग्णालय ,रक्त तपासणी केंद्र व सिटी स्कॅन सेवा असे मागणी निवेदनात करण्यात आली उपस्थित संतोष आगलावे, योगेश मैलागींरे,किरण उल्लेवार,आदींच्या उपस्थित निवेदन देण्यात आले