
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
पेठवडज :- ग्रामीण भागात नमुना नंबर ८ हे विद्यूत कनेक्शन असो वा अनेक कामांसाठी नेहमी काम पडत असते.परंतु ग्रामसेवक हे मुख्यालयी उपस्थित राहत नसतात.व केव्हा येणार कोठे गेलो काही याचा सुद्धा पत्ता लागत नाही नागरिकांना शेतीतील कामे सोडून व मजूरी सोडून आठ दहा दिवस ग्रामसेवक भेटत नाहीत.तेव्हा जिल्हाधिकारी साहेबांनी ज्याप्रमाणे ७/१२ उत्तरा मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.त्याप्रमाणे नमुना नंबर ८ हा उत्तरा आँनलाईन उत्तरा मिळण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी तहसीलदार साहेब कंधार यांच्या मार्फत जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना व्यंकटी जाधव, पांडुरंग कंधारे,प्रकाश टेंबुलवार .माधव.ईभुते यांनी जिल्हाधिकारी साहेबांना नागरिकांचा वेळ व पैसा वाचेल आणि वेळेवर कामे होतील अशी मागणी केली आहे.