
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव यांनी औरंगाबाद जिल्हातील आदर्श ग्राम पाटोदा येथील आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
नुकत्याच राजुरा विधानसभा क्षेत्रात ग्रामपंचायतीच्या निवडणुका पार पडल्या त्यात गोंडवाना गणतंत्र पार्टीने चांगली बाजी मारली आहे. गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी तेथील सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना मार्गदर्शन करण्यासाठी श्री. भास्कर पेरे पाटील यांची भेट घेत असल्याच मत चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव यांनी व्यक्त केलं.
भारताला जर महासत्ता बनवायचं असेल तर या देशातील इथल्या गावांना खऱ्या अर्थाने स्वावलंबी बनवावं लागेल व आदर्श ग्राम पाटोदा हे स्वावलंबी आहे आणि एका अर्थाने महासत्ताही आहे असेही आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांच्या कामाचा कौतुक करताना त्यानी म्हटलं आहे.
यावेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव यांच्या सह गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कोरपना तालुक्यातील युवानेते नितीन बावणे उपस्थित होते.