
तिजोरी उघडली आणि…
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सध्या भारतासोबतशत्रुसारखे वागत आहेत. आधी त्यांनी भारतीय सामानाच्या अमेरिकेतीलआयातीवर25 टक्के टॅरिफ लावला. त्यानंतर रशियाकडून तेल खरेदीच कारण देऊन अजून अतिरिक्त 25 टक्के टॅरिफ लावला
त्यांनी भारतातून अमेरिकेत निर्यातहोणाऱ्या सामानावर एकूण 50 टक्के टॅरिफ लावला आहे. त्याचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे. भारताने अमेरिकेला नेहमीच चांगल्या मनाने साथ दिली. पण तेच ट्रम्प भारतासोबतशत्रुसारखे वागत आहेत. तरीही अमेरिकेत स्थायिक झालेल्या भारतीयांनी मनाचा मोठेपणा दाखवला आहे.
भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी 2008 पासून आतापर्यंत अमेरिकन विश्वविद्यालयांना तीन अब्ज डॉलर्सपेक्षा अधिकच दान केलं आहे. यामुळे अमेरिकेत संशोधन, इनोवेशन आणि उच्च शिक्षणाचा पाया अजून मजबूत होणार आहे. अमेरिकेत स्थायिक असलेल्या भारतीय प्रवासी समुदायाच योगदान यातून दिसून येतं. एका सर्वेक्षणातून भारतीय समुदायाच्या योगदानाची बाब समोर आली आहे.
इंडियास्पोराने काय म्हटलं?
अनेक भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिकांनी अमेरिकन विश्वविद्यालयातून पदवी घेतली. आपल्या व्यावसायिक यशाच श्रेय ते या अमेरिकन विद्यापीठांना देतात असं इंडियास्पोरा या संस्थेने म्हटलं आहे.
कुठल्या भारतीयांनी किती कोटीच दान केलं?
अमेरिकेत उच्च शिक्षण संस्थांना ऐतिहासिक दान देऊन भारतीय-अमेरिकी समुदाय त्यांच्या जीवनाला आकार देणाऱ्या फक्त त्या संस्थांचा सन्मान करत नाहीय, तर भावी पिढ्यांना शिकण्याची, नेतृत्व विकासाची संधी मिळावी हा सुद्धा दूरदृष्टीकोन त्यामागे आहे असं इंडियास्पोरानेम्हटलं आहे. दान देणाऱ्यांमध्येप्रामुख्याने चंद्रिका आणि रंजन टंडन आहेत. त्यांनी न्यूयॉर्क विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ इंजीनियरिंगला 10 कोटी डॉलर्सच योगदान दिलं. पेप्सिकोच्या माजी सीईओइंद्रानूयी यांनी येलच्या स्कूलऑफमॅनेजमेंटला 5 कोटी डॉलरदान केले. आतापर्यंत कुठल्याही बिझनेसस्कूलला देण्यात आलेलं हे सर्वात मोठं दान आहे. उद्यमीदेशपांडेनेMIT ला 2 कोटी डॉलरदान केले.
अमेरिकेप्रती व्यापक कटिबद्धता
ओहायोयेथे मोंटेआहूजा, टेक्ससमध्येसतीश आणि यास्मीनगुप्ता, फ्लोरिडात किरण आणि पल्लवी पटेलसह अन्य लोकांनी आपल्या परोपकाराने चिकित्सा आणि शैक्षणिक कार्यक्रमांना नवीन रुप दिलय. इंडियास्पोराचे संस्थापक आणि अध्यक्ष एमआररंगास्वामी म्हणाले की, “विश्वविद्यालयात गुंतवणूक करुन शिक्षणाला महत्व देणारे भारतीय अमेरिकी दानदात्यांनी चांगलं कार्य केलं आहे. अमेरिकेप्रती आपली व्यापक कटिबद्धता दाखवून दिलीय.