
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
अपघाताचे प्रमाण वाढत आहे तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प का बसले
सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष…!
कंधार – घोडज- शेकापूर रस्त्याचे काम चालू झाले असून ते अपुर्ण कामामुळे वाहतूकीस अडथळा निर्माण होत आहे,व अपघातचे प्रमाण वाढत असून या पर्यायी मार्गाचा लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात यावे अशी जनतेतून मागणी होत आहे. दि.१७ ऑक्टोंबर २०२२ रोजी रस्त्यावर डांबर कमी व गिटी जास्त असे काम चालु होते,तेव्हा माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी रस्ता बंद आंदोलन करणार म्हणून चेतावणी दिली होती,त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याचे काम बंद केले व कामगार निघून गेले.काम बंद होऊन जवळपास २० दिवस झाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन जनतेचा अक्रोश कमी करण्यास मदत करावी. रोडची अवस्था पाहून असे सुचले कि काय खड्डे…? काय दुरुस्ती…? सगळे ओके मग दिसतेय पण कोणाचे लक्ष नाही दिसतेय बा..?
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अधिकच त्रस्त असलेल्या कंधार करांच्या वाढलेल्या धुळीत भर पडली आहे. व श्वसन विकार होण्याचा धोका वाढला आहे,रस्त्यावरील खड्डे चुकवत अगोदरच कसरत करणाऱ्या दुचाकी चालकांना धुळीचे कण डोळ्यात गेल्यामुळे गाडी चालवताना अडचणी येत आहेत,
कंधार ते घोडज शेकापूर मार्गावर तर धुळीची समस्या अधिकच बिकट झाली आहे. या रस्त्यावर टाकलेल्या मुरमाच्या ढिगारे व गिट्टीचे ढिगारे टाकलेल्या मुळे . हे समस्या निर्माण झाली आहे.
कंधार तालूक्यातील बहादरपुरा जवळील मण्याड नदीवरील पुलाचे काम चालु असल्यामुळे मुखेड,जांब मार्गे जाणारे सर्व वाहने कंधार – घोडज रोड ने शेकापुर मार्गे फुलवळ जात आहेत.रस्ता अपुरा व त्यात सार्वजनिक बांधकाम विभाग ने आणून ठेवलेले साहित्य गीटी रस्त्याच्या कडेला असल्याने कंधार तालुक्यातील वाखरड येथील शंकर दिगांबर कागणे वय ४५ हे दि.५ नोव्हेंबर रोजी कंधार हून घोडज मार्गे मोटार सायकलने वाखरड कडे जात असताना शेकापूर जवळ रस्त्यावरील मुरमाच्या ढिगार्यास धडकून ते जागीच ठार झाले हा अपघात रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास झाला आहे.तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्ष मुळे असे अपघात होत आहेत.वाहणे जाण्यास अडचणी येत आहेत व ट्रॉफीक होत आहे, प्रशासनाने लक्ष द्यावे अशी जनतेतून मागणी होत आहे.,