
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
चिखली :- कंधार तालुक्यातील चिखली येथील नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शेतकऱ्यांना गोरगरीबांना टक्केवारी किंवा दलाल लावल्याशिवाय शासनाचे अनुदान असो की कोणतेही पैसे दलाल लावल्याशिवाय मिळत नाही.शासनाने असे कोठेही सांगितले नाही की टक्केवारी द्या किंवा दलाल लावा मगच तुमचे अनुदान भेटल म्हणून तर मग चिखली येथील बॅकेचे कर्मचारी स्वताचे घर भरण्यासाठी गोरगरीब शेतकऱ्यांना शासनाने दिलेल्या तुटपुंज्या अनुदानातून टक्केवारी घेतल्याशिवाय शेतकरी बांधवांना भेटू देत नसतील आणि बॅकेतील कर्मचारी व अधिकारी अशा पध्दतीने वागत असतील तर राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या आंदोलनात होणार्या परिणामास नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा चिखली चे कर्मचारी व मॅनेजर जबाबदार राहतील.बॅकेत एक रुपया न देता आपले पैसे आपल्याला मिळाले पाहिजेत.तुमचे पैसे मिळत नसतील तर आमच्याशी संपर्क साधावा ९९७०९२३३३९ असे किरण गायकवाड यांनी सांगितले की राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही कर्मचारी व मॅनेजर यांना वेठीस धरू व राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या स्टाईलने आंदोलन करू असे राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.