
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी नांदेड – संभाजी गोसावी
जिल्ह्यांतून एक दुःखद बातमी समोर आले आहे. भारत जोडो योजनेच्या ६२ उद्या दिवशी सकाळी सेवा दलाचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच मध्य प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे प्रभारी कृष्णकुमार पांडे यांचे हृदयविकारांच्या तीव्र झटक्यांने निधन झाले पांडे यांच्या निधनामुळे काँग्रेसचा एक कट्टर हरपला अशा शब्दांत अनेक राजकीय मंडळींनी श्रद्धांजली वाहिली. पांडेच्या निधनांची बातमी सर्व जिल्ह्यांतील पत्रकारांना देण्यात आली. श्रीकृष्ण कुमार पांडे हे नांदेड शहरामध्ये आज सकाळी भारत जोडो यात्रा सुरू होताच तिरंगा हातात घेवुन अनेक दिग्गजासिंह यांच्या सोबत चालत होते काही वेळानंतर त्यांनी तिरंगा झेंडा दुसऱ्या कार्यकर्त्याकडे सोपविला व मागून चालत होते अचानक ते खाली कोसळले त्यांना तातडीने हॉस्पिटलला पाठविण्यांत आले पण त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले कृष्णकुमार पांडे हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. आणि जीवनात अखेरच्या श्वांसापर्यंत ते काँग्रेसचे पाईक राहिले तसेच महाराष्ट्र सेवा दलाचे अध्यक्षपदी त्यांनी भूषविले होते. आम्हांला वेळोवेळी मार्गदर्शन करणारे आमचे सहकारी तथा वरिष्ठ काँग्रेस नेते कृष्णकुमार पांडे यांच्या अचानक जाण्यांमुळे आज राजकीय वर्तुळात शोककळा निर्माण झाली अशा शब्दात खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला. यावेळी खासदार राहुल गांधी यांनी कृष्णकुमार पांडे यांच्या मुलाची भेट घेत पांडे कुटुंबीयांचे सांत्वन केले. कृष्णकुमार पांडे यांनी अखेरच्या श्वासापर्यंत देशाचा आणि महाराष्ट्रांचा तिरंगा हातात घेतला आणि शेवटच्या श्वांसापर्यंत ते काँग्रेसचे कट्टर पाईक राहिले अशा शब्दांत अनेक राजकीय मंडळींनी श्रद्धांजली वाहिली.