
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी सातारा- संभाजी गोसावी
सातारा जिल्ह्यांचे सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल मॅडम यांचे सोमवारी रात्री उशिरा सांगली अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर पदोन्नतीने नियुक्ती करण्यांत आली. यांच्यासह सातारा जिल्ह्यांचे अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे यांचीही बदली करण्यांत आली त्यांची बदली मात्र नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहे तर त्यांच्या जागी बापू विठ्ठल बांगर हे सातारचे नवे अप्पर पोलीस अधीक्षक असणार आहेत. श्रीमती.आँचल दलाल मॅडम यांनी सातारच्या ऐतिहासिक जिल्ह्यामध्ये त्यांची कामगिरी पारदर्शक आणि कर्तव्यदक्ष ठरली. तत्कालीन पोलीस अधीक्षक तेजस्विनी सातपुते अजयकुमार बंसल साहेब यांच्या बरोबरीने त्यांनी जिल्ह्यांमध्ये गुन्हेगारीवर चांगलाच वचक ठेवला होता. तसेच त्यांची पोलीस प्रशासनांमध्ये शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून त्यांची चांगलीच ओळख होती. सातारा जिल्ह्यांचे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या त्या बहीण होत्या. तर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी यांच्या त्या पत्नी आहेत. सांगलीच्या अपर पोलीस अधीक्षक मनीषा डुबले मॅडम यांनी सांगलीचे तत्कालीन अधीक्षक दीक्षिंतकुमार गेंदम यांच्या समवेत त्यांनी सांगली जिल्ह्यांमध्ये महिला सक्षमकरणासह गुन्हेगारीवर चांगलेच नियंत्रण ठेवले होते . त्यांची सांगली जिल्ह्यांत त्यांची यशस्वी कारकीर्द ठरली. आणि गुन्हे त्यांनी उघडकीस आणले तसेच त्यांना सांगली जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य मिळाले त्यामुळे मनीषा डुबले मॅडम यांना सांगली जिल्ह्यांत उत्कृंष्ट आणि पारदर्शक काम करता आले.आता सांगली जिल्ह्यांमध्ये डॉ. बसवराज तेली पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल मॅडम हे दोघेही भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) अधिकारी आहेत. आँचल दलाल मॅडम यांची सांगली येथे अप्पर पोलीस अधीक्षक या पदावर झाल्याची समजताच सातारा जिल्ह्यांचे विद्यमान संभाजी पुरीगोसावी यांनी त्यांची सदिंच्छा भेट घेवुन आँचल दलाल मॅडम यांचे भव्य स्वागत केले. यावेळी पुरीगोसावी पुढे म्हणाले मॅडम आपण सातारच्या ऐतिहासिक जिल्ह्यांमध्ये उत्कृंष्ट आणि पारदर्शक आपली कामगिरी ठरली तसेच सातारा जिल्ह्यांमध्ये तुम्ही पदभार घेतल्यापासून आम्हांला नेहमी सहकार्य केल्याबद्दल प्रथम मॅडम आपले आभार मानतो. आणि आपण आता सांगली जिल्ह्यांमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक पदावर आपण आता विराजमान होणार आहात. पोलीस उपाधीक्षक पदाचा पदभार स्वीकारल्यापासून तुमच्याकडूंन आम्हांला चांगले सहकार्य मिळाले तसेच जिल्ह्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच पोलीस कर्मचाऱ्यांचे सहकार्य मॅडम तुम्हांला चांगले लाभले त्यामुळे तुम्हांला या जिल्ह्यांमध्ये उत्कृंष्ट आणि पारदर्शक काम करता आले तुम्हांला पुढील वाटचालीस शुभेच्छा अशा शब्दांत पुरीगोसावी यांनी आँचल दलाल मॅडम यांची सदिंच्छा भेट घेत त्यांना शुभेच्छा देण्यांत आल्या. आपली बदली झाल्यांचे पाहून मॅडम मी चांगलाच भावुक झालो. नेहमी सहकार्य करणाऱ्या कर्तव्यदक्ष अधिकारीच आता जिल्ह्यांबाहेर जाऊ लागले आहेत. पण शेवटी मॅडम नोकरी म्हटले की बदली ही आलीच मॅडम आपला सातारा जिल्ह्यांसाठी कार्यकाळ चांगलाच राहिला असे पुरे गोसावी आँचल दलाल मॅडम यांच्या सदिंच्छा भेटीत म्हणाले..