दैनिक चालू वार्ता किनवट प्रतिनिधी- दशरथ आंबेकर
ओला दुष्काळ,पिक विमा परतावा, जमिनीच्या प्रश्नावर लढ्यात सामील व्हा – काॅ.अर्जुन आडे
इस्लापुर (कुपटी) :अखिल भारतीय किसान सभा व संयुक्त किसान मोर्चा च्या वतिने २३ – २६ नोव्हेंबर दरम्यान शेतकरी – कष्टकऱ्यांच्या प्रश्नावंर देशव्यापी, राज्यव्यापी लढ्याचे अव्हाण करण्यात आले अाहे,त्या अनुशंगाने किसान सभा नांदेड जिल्हा समितीच्या वतिने सामुहिक उपोषणाचे हत्यार हाती घेत शेतकरी तथा जनतेच्या प्रश्नावर २३ – २६ नोव्हेंबर दरम्यान जिल्हातील प्रत्येक तहसिल कार्यलयावर किसान सभेचे कार्यकर्ते, शेतकरी उपोषणास बसणार आहेत.तथा २६ नोव्हेंबर संविधान दिनी जिल्हाधिकारी कार्यलय, उपविभागीय अधिकार कार्यलयावर धडक आंदोलन करण्याचे कळविले आहे.
परतिउच्या पाऊसाने झालेले प्रचंड नुकसानाच्या धर्तीवर ओला दुष्काळ जाहिर करा,नांदेड जिल्हातील ९ लाख शेतकऱ्यांनी भरलेल्या पिक विमाचा १००% परतावा द्या,मुबंई उच्च न्यायालयाने गायराण जमिनी काढुण घेण्याचे दिलेले आदेश रद्द करा,वन जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे करा, हामीभावाचा केद्रिय कायदा करा,रोजगारी हामीच्या कामाचे वेतन व दिवस वाढवून ७०० रु मजुरी द्या,जिल्हा परिषद तथा बांधकाम विभागात अंतर्गत येणारी तोंटबा,पिंपरी,भडरवाडी,कंचली,मलकजाम,कोसमेट,पांगरी इत्यादी गावातील मोडकळीस आलेली रस्ताचे कामे सुरु करा,खरीपची सर्व पिक कर्ज माफ करा, किमान वेतेन, रोजगार यासह इतर अनेक प्रश्नावर उपोषणाच्या माध्यमातून लढा उभारण्याचे नियोजन किसान सभेच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आले.ओला दुष्काळ, पिक विमा तथा जनतेच्या प्रश्नावर होणाऱ्या या लढ्यात शेतकरी कष्टकऱ्यांनी मोठ्या संख्याने सहभागी होण्याचे अव्हाण किसान सभेचे राज्य उपाध्यक्ष काॅ.अर्जुन आडे यांनी केले आहे.
बैठकीस किसान सभेचे तानाजी राठोड,खंडेराव कानडे,विजय जाधव,आनंद लव्हाळे, अनिल आडे,दिलीप तुमलवाड,नारायण चोपलवाड,जयवंत राठोड,शेषराव ढोले,शिवाजी किरवले, दिलीप जाधव,द्यानेश्वर नाईक,शिवाजी आडे ,शेषराव राठोड आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
