
दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी :राम चिंतलवाड
–
काल नांदेडहून भारत जोडो यात्रा जात असतांना हिंगोली जवळील चोरंबा फाटा येथे हदगाव-हिमायतनगर तालुक्यातील आमदार माधवराव पाटील जवळगांवकर यांनी महाराष्ट्र राज्य नकाशाच्याआकाराचा अनेक फुलांनी बनवलेला मोठा हार घालून खासदार राहुल गांधी यांचे स्वागत विधानसभा मतदारसंघाच्यां वतीने करण्यातआले.आणि हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे अनेक पदाधिकारी,कार्यकर्ते,वकील,डॉक्टर, सरपंच,उपसरपंच,पत्रकार यावेळी भारत जोडो यात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होते.ही भारत जोडो यात्रा पुढे हिंगोली जिल्ह्यात गेली आहे.