दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
पेठवडज :- पेठवडज हे गाव कंधार तालुक्यातील सर्वात मोठे सर्कल आहे.येथील पशू दवाखाना चाळीस वर्षांपूर्वी बांधलेला आहे.तो मोडकळीस आलेल्या इमारतींच्या आत चालू आहे.त्यामुळे नवीन पशू वैद्यकीय दवाखाना बांधून देण्यात यावा तसेच औषधी पुरवठा अतिशय कमी प्रमाणात असल्याने गोरगरीब शेतकऱ्यांना औषधी बाहेरून आणावे लागत आहे.सध्या लम्पी आजार मोठ्या प्रमाणात जनावरे बिमार पडत आहेत व शासकीय पशू वैद्यकीय दवाखान्यात गोरगरीब जनतेसाठी औषधी बाहेरूनच आणायला सांगितले जाते.ते परवडत नाही प्रत्यक्षात चौकशी करून तातडीने औषधी व गोळ्या उपलब्ध करून देण्यात याव्यात अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव आमरण उपोषणाला बसावे लागेल असे श्री.व्यंकटी गोविंद जाधव व श्री.पांडूरंग व्यंकटी कंधारे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद नांदेड व जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे.
