दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी-लक्ष्मण कांबळे
उस्माननगर:- येथील कष्ठाळु, व सदन शेतकरी तथा समता शिक्षण प्रसारक मंडळाचे अजीवन सदस्य , प्रगतिशील शेतकरी श्रीनिवास देशमुख यांना राष्ट्रीय महामार्गावरील कॅनॉल जवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.हा अपघात ऐवढा मोठा होता की ,रोडवर रक्ताचा सडा पडला होता.
श्रीनिवास देशमुख हे दुपारी नेहमीप्रमाणे आपल्या जवळील एम एच 26 एस ४१०४ या मोटरसायकल वरून दि.सोळा नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घरा कडून शेताकडे जात असताना उस्माननगर येथील कॅनॉल जवळ येताच एका अज्ञात वाहनाने धडक मारल्याने जागीच त्यांचा मृत्यू झाला. ते सज्जन व मनमिळावू स्वभावाचे मेहनती शेतकरी व्यक्तिमत्त्वा होते. त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगी , एक मुलगा असा परिवार आहे . अत्यंत संयमी व सदन शेतकरी म्हणून उस्माननगर परिसरात सर्वपरिचित होते. राष्ट्रीय महामार्गावर अनेक महिन्यापासून अपघाताची मालिका सुरू असून गेल्या एक ते दीड महिन्यापासून सतत अपघात होत असल्यामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अनेकांचे संसार उध्वस्त होत आहेत . घरातील कर्ता पुरुष जातो तेव्हा त्या घरावर काय कळा पसरते याचे जिवंत उदाहरण म्हणजे ज्या घरी मृत्यू झाला त्यांच्या घरच्यांनाच माहीत असते .ज्या घरचा कर्ता जातो तेव्हा त्यांच्या या घरच्यांनाच त्यांची व्यथा कळते .श्रिनीवास देशमुख यांची उस्माननगर परिसरात चांगल्या प्रकारे ओळख होती त्यांच्या निधनाची बातमी गावात कळताच सगळीकडे हळहळ होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या प्रमाणात वाढ झाल्याने प्रशासनाकडून 108 ही रुग्णवाहिका 24 तास उपलब्ध करून देण्यात यावी अशी जनतेतून मागणी होत आहे. नांदेड ते उस्माननगर राष्ट्रीय महामार्गावर पोलीस चौकीची व्यवस्था करण्यात यावी अशी सुद्धा जनतेतून मागणी होत आहे.
राष्ट्रीय महामार्गावर अपघाताच्या प्रमाणातील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावी अशी सुद्धा जनतेतून मागणी होत आहे.राष्ट्रीय महामार्गावरील अपघात होनार नाहीत यासाठी उपाययोजना करावे अशी जनतेतून मागणी होत आहे.
