दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा तालुक्यातील मंगरूळ येथे आझाद ग्रुपच्या वतीने टायगर ग्रुपचे लोहा तालुका अध्यक्ष वैभव भैय्या हाके यांचे अभिष्टचिंतन करण्यात आले.
आझाद ग्रुप व टायगर ग्रुप हे सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असुन दोन्ही ग्रुप हे समविचारी असुन लोहा तालुक्यात सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणारे टायगर ग्रुपचे लोहा तालुका अध्यक्ष वैभव भैय्या हाके यांच्या वाढदिवसानिमित्त मंगरूळ येथे आझाद ग्रुपच्या वतीने आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांनी शाल पुष्पहार घालून पेढा भरवून भव्य सत्कार केला.
यावेळी आझाद ग्रुपचे लोहा तालुका अध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर, प्रसाद पोले,किरण पाटील हाके आदी उपस्थित होते.
