दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोकहित सर्वोपरी हे बिद्र वाक्य घेऊन अल्पावधीतच सामाजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक, कृषी आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांचे नांदेड येथे आझाद ग्रुपच्या वतीने आझाद ग्रुपचे नांदेड जिल्हा अध्यक्ष प्रभाकर पांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य दिपक रायफळे,लोहा तालुका अध्यक्ष रुद्रा पाटील भोस्कर यांच्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले.
आझाद ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे यांचे नांदेड येथे जोरदार स्वागत झाल्यानंतर ते आझाद ग्रुपच्या पुढील कार्यक्रमास देगलूरकडे विविध कार्यक्रमांसाठी रवाना झाले.
