दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
उस्मानाबाद:-तुळजापूर शहरातील नाभिक समाजातील सलून व्यवसायिकाच्या मुलाने खडतर परिस्थितीवर मात करून अभ्यासात प्रचंड मेहनत घेऊन वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस सारख्या महत्वाच्या अभ्यासक्रमा करीता प्रवेश मिळविला आहे.
तुळजापूर शहरातील जिजामाता नगर मधील सलून व्यवसायिक पांडुरंग कावरे यांचा मुलगा प्रसाद कावरे याने नुकत्याच झालेल्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या(एमबीबीएस नीट) प्रवेश पात्रता परीक्षेत उज्वल यश संपादन करीत तब्बल ५४० गुण प्राप्त केले आहेत.प्रसाद कावरेचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तुळजापुर येथेच झाले असून बारावी पर्यंतचे शिक्षण त्याने वैराग येथील अर्णव महाविद्यायात पूर्ण केले आहे.एमबीबीएस होण्याचे उदिष्ट आणि त्यासाठी लागणारे प्रचंड कष्ट याची योग्य सांगड घालून अभ्यासातील सातत्याच्या जोरावर त्याने हे यश संपादन केल्याचे सांगितले.प्रसादच्या या महान कामगिरीबद्दल महाराष्टातील नाभिक संघटनेच्या वतीने कौतुक, अभिनंदन करण्यात आले. प्रसाद ने संपादन केलेले यशाबद्दल वडील पांडुरंग कावरे,आई संजीवनी कावरे, यांना आनंद अश्रू अनावर झाले.प्रसादच्या यशाची दखल राज्यभरातील समाज बांधवांनी घेतली. यावेळी सहाय्यक फौजदार सत्यधर जगदाळे, गोरख यादव, सागर जगदाळे, भगवान यादव, श्रीधर जगदाळे, सुशांत डाके, प्रशांत डाके, बाळकृष्ण आलमले, पत्रकार नवनाथ यादव तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी आणि समाज कार्यकर्ते त्याच्या यशाचे कौतुक करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत आहेत.
