दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत मावशीच्याच घरी डल्ला मारल्याचा प्रकार पोलिस तपासात निष्पन्न झाला असून त्या चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १९ नोव्हेंबर रोजी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरून नेलेले नगदी १ लाख ४० हजार रुपये व मोबाईल असा एकुण १ लाख ४९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी चोरट्यांचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार स्थागुशाचे पोनि द्वारकादास चिखलीकर यानी स्थापन केलेल्या पथकास यातील आरोपी नांदेडच्या मध्यवर्ती बसस्थानक परिसरात असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरुन पथकाने १९ नोव्हेंबर रोजी बस स्थानकावर जावुन सापळा रचुन आरोपी रामेश्वर ऊर्फ रामा कुंभार (२१) रा. पिंपळगाव(गाडे ) ता. परळी यास पकडून विचारपुस करता, त्याने पोलिस ठाणे देगलूर येथे मावशीच्याच घरी केलेल्या गुन्ह्याची माहिती देऊन त्याचा साथीदार यशवंत बालाजी मिरजगावे रा. लातुर याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. यावेळी त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्या बॅगमध्ये देगलूर येथुन चोरी केलेल्या नगदी १ लाख ४० हजार रुपये व चोरीच्या पैशातून खरेदी केलेला एक टेक्नो कंपनीचा ९ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण १ लाख ४९ हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन आरोपीस पोलिस ठाणे देगलूर येथे पुढील तपासकामी देण्यात आले आहे. आरोपीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
कारवाई केलेल्या या पथकात स्थागुशाचे पोनि व्दारकादास चिखलीकर, पोउपनि सचिन सोनवणे, सपोउपनि संजय केंद्रे, पो.हे.कॉ. गुंडेराव करले, अफजल पठाण, संजय जिंकलवाड, विठ्ठल शेळके, गजानन बयनवाड, शंकर केंद्रे, दिपक ओढणे, सिटीकर यांचा समावेश होता.रजू सिटीकर यांचा समावेश होता.
