दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव पाटील कळकेकर
बोरी :- सर्व परमार्थ प्रेमी भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की, प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री क्षेत्र महादेव मंदिर मौजे बोरी (बु.) येथे श्री भागवत कथेचे व अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.तरी पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी श्रवणाचा व महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा ही नम्र विनंती.प्रारंभ दि.२५/११/२०२२ वार शुक्रवार, सांगता दि.०२/१२/२०२२ वार शुक्रवार.सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.पहाटे ४ ते ६ काकडा भजन, सकाळी ७ ते १० गाथा पारायण, १० ते १२ गाथा भजन, दुपारी १ ते ४ भागवत कथा, दुपारी ४ ते ६ महाप्रसाद,साय.६ ते ७ हरीपाठ, रात्री ७ ते ८ महाप्रसाद, रात्री ९ ते ११ किर्तन, त्यानंतर हरीजागर.दि.२५/११/२०२२ शुक्रवार ह.भ.प.शंकर महाराज मसलगेकर यांचे किर्तन त्यानंतर हरीजागर भजनी बोरी बु.,कागणेवाडी,नावंदेवाडी, पाताळगंगा.दि.२६/११/२०२२ रोज शनिवारी ह.भ.प.रोहीदास महाराज कळकेकर,हरीजागर टोकवाडी, कळका,कळकावाडी,शेल्लाळी.दि.२७/११/२०२२ रोज रविवारी ह.भ.प.मधुसुदन महाराज कापसीकर .हरी जागर वाखरड,वाखरडवाडी, पिंपळाचीवाडी ,ब्रम्हवाडी..२८/११/२०२२ सोमवारी ह.भ.प.विष्णू महाराज , मुकूंदराज संस्थान अंबेजोगाई.हरीजागर आंबुलगा,गौळ, खंडोबाचीवाडी ,फुलवळ,उर्मज.दि.२९/११/२०२२ मंगळवारी ह.भ.प.भागवताचार्य जगदीश महाराज सोनवणे.हरीजागर मंगनाळी,पेठवडज, सिरसी,गोणार.दि.३०/११/२०२२ बुधवारी ह.भ.प.भागवताचार्य चंद्रशेखर महाराज देगलूरकर.हरीजागर हरनाळी,गुंडेवाडी,तांदळी,मोहीजा.दि.०१/१२/२०२२ गुरूवारी ह.भ.प.नामदेव महाराज दापकेकर . हरीजागर सार्वजनिक शास्त्रीय संगीत भजन.दि.०२/१२/२०२२ शुक्रवारी ह.भ.प.माऊली महाराज अरबुजवाडीकर शिंदगी संस्थान.काल्याचे किर्तन व सांगता वेळ सकाळी १० ते दुपारी १२ .आ.डाॅ.तुषार गोविंदराव राठोड साहेब,मुखेड-कंधार विधानसभा मतदारसंघ आणि समस्त ग्रामस्थ मंडळी, बोरी बु.तर्फे महाप्रसाद .विणा प्रमुख :- वैजनाथअप्पा मंडगीकर ,किर्तन साथ:- परीसरातील सर्व गुणीजन ,गायक,वादक व भजनी मंडळ सात दिवस उपस्थित राहतील.हरीपाठ :- ज्ञानोबा माऊली उर्मजकर वारकरी शिक्षण संस्था व लहु महाराज भजनी मंडळ मोहीजा परांडा या.कंधार. काकडा प्रमुख :- हरनाळी व हिब्बट ह.भ.प.गंगाधर महाराज पांचाळ (एकनाथ गाथा पारायण प्रमुख). विशेष उपस्थिती :- मा.न्यायमुर्ती मारोतराव गणपतराव गायकवाड साहेब,आ.डाॅ.तुषारभाऊ राठोड साहेब,आ.राम पाटील रातोळीकर साहेब,मा.आ.सुभाष साबणे साहेब,मा.व्यंकटराव पाटील गोजेगांवकर साहेब . सप्ताह नियोजन समिती :- श्री.प्रविण पाटील चिखलीकर साहेब, श्री.बाबुराव केंद्रे उमरगेकर ,श्री.बालाजी पाटील मारतळेकर , श्री.बालाजीराव झुंबाड.सुचना:- शिवशंकर ट्रस्ट महादेव मंदिर मौजे बोरी बु.च्या वतीने विवाह सोहळ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.श्रीक्षेत्र महादेव मंदिर बोरी बु ता.कंधार हे गाव मुखेड ते कंधार रोडवर कळका फाट्यापासून उत्तरेस ५ की.मी.अंतरावर आहे.प्रकाशक :- सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर (जि.प.सदस्या),सौ.माधुरी देवानंद सांगवे(उपसरपंच बोरी बु.) विनीत :- खा.प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब अध्यक्ष शिवशंकर ट्रस्ट महादेव मंदिर बोरी बु. व समस्त गावकरी मंडळी बोरी(बु.),कागणेवाडी, कळका,कळकावाडी,नावंदेवाडी,टोकवाडी, मंगनाळी,वाखरड, वाखरडवाडी, पिंपळाचीवाडी ता.कंधार जि.नांदेड .स्थळ:- महादेव मंदिर बोरी (बु.) ता.कंधार जि.नांदेड.
