
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भु म:-श्री संत सेना महाराज युवा बचत गटाला पाच वर्ष पूर्ण झाले आसल्यामुळे गटाच्या ५ वी वार्षिक बैठकी चे आयोजन शासकीय विश्रामगृह भूम येथे करण्यात आले होते.गटातील सर्व सदस्यांना माजी नगराध्यक्ष, विकासरत्न संजय गाढवे,महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने,राज्य संघटक किशोर राऊत यांच्या हस्ते ५ वा वार्षिक अहवाल व धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी गटनेते संजय गाढवे यांनी गटाच्या सर्व सदस्यांना मार्गदर्शन करून कुठल्याही कामासाठी,कसल्याही अडचणी च्या वेळी मि तुमच्या नेहमी पाठीशी आसेल आसे सांगितले. तसेच गटाच्या सर्व सदस्यांचे त्यांनी अभिनंदन केले. जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने व राज्य संघटक किशोर राऊत यांनी ही बचत गटा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले .
या वेळी गटाचे अध्यक्ष दादासाहेब राऊत, सचिव राकेश चौधरी, सर्व सदस्य विकास यादव , संजय चौधरी,अश्रु चौधरी, बाळासाहेब चौधरी, संभाजी चौधरी, बालाजी राऊत, दिगंबर सांगोळे,रमेश राऊत, धनराज चौधरी, चंद्रकांत राऊत, ज्ञानेश्वर चौधरी , अक्षय चौधरी , श्रीराम चौधरी , बाबुराव पंडित , दीपक गवळी ,सुनील चौधरी,दत्ता शिंदे,तालुका प्रसिद्धीप्रमुख तथा पत्रकार नवनाथ यादव,जिल्हा शहराध्यक्ष अक्षय माने,जिल्हा संघटक गणेश वाघमारे, रामभाऊ बागडे उपस्थित होते. तसेच असंख्य समाज बांधव उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार श्री संत सेना महाराज युवा बचत गटाचे अध्यक्ष दादासाहेब राऊत यांनी मानले .