
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे – संभाजी गोसावी
पुणे जि. भिगवण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकी आणि मोबाईल चोरीच्या घटना वाढल्यांने भीतीचे वातावरण निर्माण झाले होतं. सदर दाखल गुन्ह्यांचा भिगवण पोलिसांनी कसून छडा लावला. याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी याकामी गुन्हे शोध पथकांची नियुक्ती केली होती. त्यानुसार गोपनीय बातमीद्वारा मार्फत माहितीवरुन भिगवण पोलिसांनी दौंड मधून एका आरोपीस दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यांत घेवुन त्यांच्याकडे सखोल चौकशी करीत त्यांच्याकडूंन ३ दुचाकी आणि १८ मोबाईल असा एकूण ३ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल भिगवण पोलिसांना हस्तगत करण्यांत यश आले. याबाबत पोलीस सूत्रांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन दिनांक १२ नोव्हेंबर २०२२ रोजी ११ ते दि.२३ नोव्हेंबर २०२२ रोजी १ वाजण्यांच्या दरम्यान इंदापूर तालुक्यांतील मौजे डाळज नं.२ गावच्या हद्दीतून प्रमोद लक्ष्मण पानसरे यांच्या ऊस तोडणी कामगारांच्या कोपीच्या बाहेरुन चार्जिंग साठी लावलेले मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरट्यांने चोरुन नेल्यांची फिर्याद भिगवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यांत आली होती. त्यानुसार भिगवण पोलिसांत कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यांत आला होता. तसेच भिगवण पोलीस ठाण्यांच्या अगदी वदीर्ळीच्या परिसरांतून दिनांक ३० ऑक्टोंबर २०२२ रोजी दुपारी दीड वाजण्यांच्या सुमारांस अज्ञात चोरट्यांनी (जालिंदर रामदास जाधव रा. करमाळा जि. सोलापूर) यांच्या मालकीची दुचाकी नंबर एम .एच ४२ डी.८६८३ तसेच एम.एच १२ बी.जे ४५५७ या क्रमांकाच्या दुचाकी चोरी करुन नेली होती. याबाबत भिगवण पोलीस ठाण्यांत हे सदरचे दोन्ही गुन्हे दाखल करण्यांत आले होते. याप्रमाणे गुन्हेच्या अनुषंगाने भिगवण पोलिसांनी हे दोन्ही गुन्हे उघडकीस आणले. सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल अप्पर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलीस अंमलदार विजय लोडी, सचिन पवार यांच्यासह पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला. सदर गुन्ह्यांचा पुढील तपास पोलीस अंमलदार महेश उगले करीत आहेत. भिगवण पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले.