
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
सामाजिक व्यवस्था आणि परंपरा यावर त्या युगातील विविध घटकांचा परिणाम हा होत असतो . युग जितकं संस्कारक्षम असतं तितकेच नाते हे संबंध मजबूत असतात . आणि जसं जसं संस्कारांचा प्रभाव कमी होतो तसं तसं नातेसंबंध हे कमकुवत आणि दुबळे होत असतात.तस पाहिलं तर त्या त्या युगाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव हा सामाजिक जीवनावर होत असतो . सध्याच सामाजिक जीवन हे आर्थिकदृष्ट्या प्रगतशील असलं आणि तंत्रज्ञान युगाच्या दिशेने जरी आपण आज वाटचाल करत असलो . मात्र सामाजिक पातळीवर विद्यमान स्थितीत नाते संबंध हे खुप झपाट्याने बिघडत चालले आहेत.हे वास्तव कोणीही सहजासहजी नाकारू शकत नाही. आणि याचे थेट वैवाहिक जीवनावर प्रतिकुल परिणाम होत आहेत .पण ह्या साठी काही तरी गंभीर कारण असली पाहिजेत पण वास्तव पाहिलं तर कोणतही गंभीर कारण नसताना फक्त अंहकार बळावला कि तो नात्यांचा बळी घेऊनच स्थिरावतो .पण हाच किरकोळ आणि मुख्य कारण असणारा अंहकार आपला मुख्य शत्रु असला तरी आपलं खोटं खोटं समाधान होण्यासाठी आपलीच बाजु सत्याची आहे .आपणच खरे असं अंहकार आपल्याला ठामपणे बजावतो . अणि आपण तेच सत्य मानतो आणि आपला शत्रु असणारा अंहकार आपण त्याला आपला सगळ्यात जवळचा हितेशी समजतो . आणि संपुर्ण जीवनाची वाट लागली तरी आपल्याला अंहकार मागे फिरू देत नाही.आणि आपली पुरती वाट लागल्यानंतर अंहाकार निघून जातो .पण तोपर्यंत सगळं आभाळ फाटलेले असतं . शिल्लक काही राहत नाही . आणि म्हणून अंहकाराचा कडेलोट हा केला तरच आपण आपल्या जीवनात असणारे आपले नातेसंबंध हे टिकवु शकतो . आणि म्हणून प्रत्येकाने सध्याच्या युगा नातेसंबंध व्यवस्थित टिकविण्यासाठी अंहकाराच सिमावलोघंन केलच पाहिजे. आणि आपल्या जीवनात अंहकार असंच आपलं रूप विस्तार करत राहिला तर मग मात्र आपलं जीवन प्रभावित झाल्याशिवाय राहणार नाही. नाते कौटुंबिक असो कि वैवाहिक जीवनातील असो त्याचं एक अनन्य साधारण असं महत्व असत .पण हे महत्व सध्या कमी झालं आहे का आणि वैवाहिक जीवनातील घटसफोटांच प्रमाण चिंताजनक झाल आहे का आणि दिवसेंदिवस हे प्रमाण अधिक वाढत आहे आणि घटस्फोट हि एक सामाजिक जीवनातील गंभीर समस्या म्हणून उदयाला येत आहे. साधारणतः नात्याचे दोन प्रकार असतात एक महणजे शाश्वत नाते संबंध आणि दुसरे म्हणजे भौतिक नाते संबंध शाश्वत नाते संबंध हे कोणत्याही प्रकारचा मोह,माया स्वार्थ या पालिकडे असतात आणि अशी नाती जीवनात खुप कमी नगण्य असतात .तर भौतिक नाते संबंध हे मोह,माय , स्वार्थ,या पायावर उभी असतात आणि म्हणून त्याचं भविष्य अंधकारमय असतं . आणि भौतिक जीवनात अहंकार हा प्रचंड असल्याने ,मी मोठा कि तु मोठा ,मी हुशार,कि तु हुशार,मी चांगला कि तु चांगला , म्हणजे अगदी किरकोळ किरकोळ विषयावर वैचारिक मतभेद निर्माण होतात आणि या मतभेदाचे अंहकार मन भेदात रूपांतर करतो .मग आशा या भौतिक परिस्थिती मध्ये कोणीही एक पाऊल मागे येत नाही आणि जर कोणी येण्याचा प्रयत्न केला तर अंहकार मागे येवु देत नाही . आणि मग सरतेशेवटी याची परिणती नातेसंबंध संपुष्टात येण्या मध्ये होते . आणि मग शेवटच्या क्षणा पर्यंत अंहकार कोणालाही माघार घेऊ देत नसल्याने नातेसंबंध संपुष्टात येतात . आणि सध्या वैवाहिक जीवनात असे प्रकार घडत असल्याने घटस्फोटाचे प्रमाण चिंताजनक बाब म्हणून उदयाला येत आहे. आणि यावर एकमेव प्रभावी उपाय हाच आहे कि अंहकार शुन्य जीवन जगता आलं पाहिजे.तर आणि तरच आपल्याला जीवनातील वेगवेगळे नातेसंबंध टिकुन राहतील .
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक9011634301