
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी -नवनाथ यादव
भुम :-शहरात शहीद हजरत टिपू सुलतान यांची जयंती एजे ग्रुप आणी टिपु सुलतान एकता ग्रुप कडून साजरी करण्यात आली. यावेळी ग्रामीण रुग्णालय येथे फळ वाटप, महात्मा गांधी उर्दू हायस्कुल येथे वही, पेन, पुस्तक वाटप व तसेच नगरपरिषदेसमोर स्टेज उभारण्यात आले होते. तिथे शहरातील सर्व पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, व्यापारी बांधवाना आमंत्रित करुन शहीद हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी अन्नदान करण्यात आले.
जयंती कार्यक्रमास श्रीमंत यशवंत राजे थोरात, काँग्रेस तालुका अध्यक्ष रुपेश अप्पा शेंडगे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष हनुमंत पाटुळे,रमेश मसकर,
गौस शेख, आजित बागडे, चंद्रमणी भाऊ गायकवाड, फेरोज बागवान, शेरखान पठान, सचिन जाधव,तय्यब पटेल, आदम भाई शेख, धोंडीराम मसकर, शेख रहीम शेख, शंकर खामकर, मयुर शाळु,रोहन जाधव, करिम सापवाले,यजाज काजी, अक्षय गाढवे, आमर भाई जमादार या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी भुम शहरातुन भव्य अशी मिरवणुक काढत मौलाली तालिम संघ वस्ताद आखतर जमादार, पैलवान आफताब जमादार व पैलवान आकलेस जमादार यांनी काठी फीरवुन उपस्थितांचे मने जिंकली.
सदरील कार्यक्रमाचे अयोजक
जयंती कमेटी अध्यक्ष आख्तर जमादार, आसिफ भाई जमादार मराठवाडा समाजसेवक, अज्जु जमादार,समीर डाॅन सय्यद,अली जमादार, सुलेमान पठान,आलीम शेख, खदीर शेख, आफताब जमादार, आकलेस जमादार, साहील मोमीन, साद शेख,मतीन मनियार, आमन बागवान, अमन सय्यद, आबेद सय्यद, सलमान पठान,इम्रान शेख, दानिश शेख, साबेर शेख, साहील शेख, हैदर जमादार आदिनी परिश्रम घेतले.