
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:-
प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री ष.ब्र.१०८ परम पूज्य वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेने व आशिर्वादाने व श्री. ष.व्र.१०८ सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, श्री.ष.व्र. डॉ.विरपक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर व श्री.ष.व्र. डॉ शभुलिग शिवाचार्य महाराज उदगिरकर यांच्या क्रपा आशिर्वादाने दि २४ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत महादेव मंदिर कौठा येथे अखंड शिवनाम सप्ताह व परम रहस्यं पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अखंड शिवनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे ४ ते ६ शिवपाठ सकाळी ८ ते ११ परम रहस्यं पारायण, दु.२ ते ४ गाथा भजन सायंकाळी ५ ते ६ शिवपाठ रात्री ९ ते ११ शिव किर्तन व जागर होणार आहे यात नामवंत किर्तनकार दि २४ नोव्हेंबर रोजी शि.भ.प.चद्रकांत गुरुजी आमलापुरे दि २५ नोव्हेंबर शि.भ.प.कैलास महाराज जामकर दि २६ नोव्हेंबर शि.भ.प. तानाजी पा थोटवाडीकर दि २७ नोव्हेंबर शि.भ.प.शिवानंद दापशेडकर दि २८ नोव्हेंबर शि.भ.प. अँड शिवानंद हैबतपुरे उदगिर दि २९ नोव्हेंबर शि.भ.प.अमोल महाराज बनवसकर दि ३० नोव्हेंबर शि.भ.प. शिवकांता पाटील मुखेडकर टाळ आरती रात्री शि.भ.प. मन्मंथ आप्पा डांगे यांचे किर्तन दि १ डिसेंबर रोजी महाप्रसादाचे किर्तन ष.व्र. श्री श्री १०८ वेदाताचार्य दिगाबंर शिवाचार्य महाराज वसमतकर याचे होणार आहे तरी परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन विरशैव महिला पुरुष भजनी मंडळ व गावकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.