
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे- संभाजी गोसावी.
मराठी,हिंदी,नाटक चित्रपट मालिका यांच्या माध्यमांतून प्रेक्षकांच्या चार दशकाहून अधिक आपल्या अभिनयांने प्रेक्षकांच्या मना मनात आदराचे स्थान निर्माण केलेले जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांची प्रकृती खालावली गेली असल्यांची माहिती डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना नुकतीच दिली आहे. मागच्या १५ दिवसापासून ते रुग्णालयांत दाखल असल्यांची माहिती मिळाली आहे.विक्रम गोखले रुग्णालयांत अत्यवस्थ स्थितीत असल्यांचेही कळत आहे. विक्रम गोखले यांनी नुकताच प्रदर्शित झालेल्या गोदावरी या सिनेमात त्यांच्या महत्वांच्या भूमिका होत्या. नेहमीच त्यांच्या भारदस्त अभिनयांने सिनेमाला चार चांद लावले गेले होते. विक्रम गोखले यांनी आजवर अनेक मालिका नाट्य अनेक हिंदी मराठी सिनेमा महत्वांच्या भूमिका बजावल्या होत्या. अभिनय क्षेत्रांत विक्रम गोखले यांनी आपले वेगळे स्थान चांगलेच निर्माण केले होते. माहेरची साडी या सिनेमांतील त्यांची भूमिका आजही अजरामर आहे. मराठी रंगभूमीवरही विक्रम गोखलेंचे मोलाचे योगदान होते. मात्र घशांच्या त्रासांमुळे त्यांनी नाटकापासून दूर राहण्यांचा निर्णय घेतला होता.