दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
कोरपना तालूका विरूड गाडेगाव
चंद्रपूर जिल्ह्य हा एक औद्योगिक शहर म्हणून ओळखला जातो चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये मोठ मोठे सिमेंट कारखाने आहेत व तिन ते चार कोळसा खाण आहे,
त्याच बरोबर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बेरोजगारी सूध्दा मोठ्या प्रमाणात वाढत आहे मोठ मोठे सिमेंट कारखाने आहेत पण स्थानिक लोकांना रोजगार नाही शिक्षण व डिग्री आहे पण व्यवसाय करायला भांडवल नाही या परिस्थितीत जिवन कस जगायचं आणि पूढची पिढी असा प्रश्न यूवा पिढीला नेहमी येतो,
हिच बाब लक्षात घेता महाराष्ट्र ट्रायबल संघटनेचे जिल्हाध्यक्ष बबन पेंदोर व यांचे सहकारी यांनी
आज दिनांक 24नोव्हेंबर 2022 रोजी महाराष्ट्र ट्रायबल आघाडी , बबन पेंदोर जिल्हा अध्यक्ष चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली मौजा w.c.L पैनगंगा परियोजना विरुर गाडेगाव च्या sub area manegar ला विनंती अर्ज निवेदन देण्यात आले आणि त्यात प्रामुख्याने स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा आणि स्थानीक लोकांच्या हाती रोजगार मिळावा अशी मागणी केली आहे
सब एरिया मॅनेजर wcl पैनगंगा विरुर गाडेगाव यांनी आमच्या निवेदनाला मान देऊन आम्हला असे सांगितले की आम्ही स्थानीक लोकांना नक्कीच रोजगार उपलब्ध करून देऊ असे आश्वासन दिले
उपस्थिती मध्ये निशांत आत्राम कोरपणा तालुका उपाध्यक्ष ,अमोल भाऊ आणि विरुर गाडेगाव शाखा महाराष्ट्र ट्रायबल आघाडी अध्यक्ष आणि समस्त पदाधिकारी व गावकरी मंडळी
