दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
नगरपरिषद नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेचा येत्या २७ नोव्हेंबर रोजी मुदखेड येथे जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संघटनेच्या विविध विषयावर चर्चा करण्यासाठी व त्या चर्चेत सहभागी होण्यासाठी बहुतांश कर्मचाऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन नगरपरिषद व नगरपंचायत संवर्ग कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बलभीम शेंडगे यांनी केले आहे.
नगरपरिषद व नगरपंचायत संवर्ग कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढा देणाऱ्या कर्मचारी संघटना सदैव सक्रिय असते वेळोवेळी या संघटनेचे तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय मिळावे आयोजित करण्यात येतात यावेळी दि. २७ नोव्हेंबर रोजी मुदखेड येथे या संघटनेचा जिल्हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मेळाव्यात नव्याने राज्याध्यक्षपदी निवड रामेश्वर वाघमारे व राज्य सरचिटणीस सुरेश पोसतांडेल कर्मचारी संघटनेकडून सत्कार करण्यात येणार आहे. लग्नाचे कार्यकारी अध्यक्ष विश्वनाथ घुगे हे या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राहणार असून उद्घाटक म्हणून पुण्याचे राज्य उपाध्यक्ष दीपक रोडे राहणार आहेत. तर धर्माजी खिल्लारे, केशव कानपुढे, मारोती गायकवाड, वैजनाथ स्वामी, सतीश देशमुख या मान्यवराची विशेष उपस्थिती राहणार आहे.
या मेळाव्यात कर्मचाऱ्यांच्या व संघटनेच्या समस्यावर सखोल चर्चा होणार आहे. यासाठी जिल्हाभरातील नगरपरिषद कर्मचारी व नगरपंचायत संवर्ग कर्मचाऱ्यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा संघटनेकडून करण्यात आले आहे.
