
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:शहरातील अंतर्गत रस्त्यांवर वाढलेले धुळीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या धुळीमुळे श्वसनाचा विकार जडण्याचा धोका निर्माण झाला आहे. यावर स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे.
शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असताना सोबतच वाहनांची संख्याही वाढली आहे. अगोदरच खराब रस्ते आणि या रस्त्यावरून एखादे वाहन गेल्यास सगळीकडे धूळच धूळ निर्माण होते. त्यामुळे नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतपाण्याची टाकी ते देगाव नाका, भायगाव रोड ते जुने बसस्थानक, गांधी चौक ते नवीन सराफा, जुने बसस्थानक ते नवीन बसस्थानक या प्रमुख मार्गासहित शहरातील अंतर्गत रस्त्यांवर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याकडे मात्र स्थानिक प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
धूळ असो की हवेतील प्रदूषण, यामुळे शरीरावर तसेच फुप्फुसावर याचे थेट परिणाम होऊन श्वसनाचे विकार जडू शकतात.
त्यासाठी लहान मुलांसहित ज्येष्ठ नागरिकांनी या रस्त्यांवरून चालताना किंवा वाहन चालवताना तोंडाला रुमाल किंवा मास्क परिधान करून विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली
आता तरी प्रशासनाचे डोळे उघडून देगलूर शहरातील नागरिकांचे स्वास्थ्य कसे निरोगी राहतील याकडे लवकरात लवकर लक्ष देण्याची गरज आहे