
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा 26 नोव्हेंबर 2022 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केहाळ वडगाव येथे संविधान दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे सहशिक्षक कांबळे सर यांनी सूत्रसंचालन केले मुख्याध्यापक एस. एन. चरकेवाड सर यांनी प्रास्ताविक करत असतांना विद्यार्थ्यांना संविधानपर मार्गदर्शनात भारतीय संविधान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत
भारतीय संविधान हा आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. संविधानामुळेच आजही आपल्या देशाचे ऐक्य व एकात्मता अबाधित आहे.
जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या जाणाऱ्या भारतीय राज्यघटनेचे महत्त्व अधोरेखित करणारा संविधान दिवस साजरा करताना आपल्या लोकशाही मूल्यांचे जतन करण्याचा निर्धार करूया
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनानिमित्त शतशः नमन केले.या वेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नारायण भाऊ दवणे, सदस्य पांडुरंग भाऊ दवणे व शिक्षण प्रेमी नागरिक सिद्धेश्वर भाऊ दवणे व विद्यार्थी उपस्थित होते. सर्व विद्यार्थ्यांकडून संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाचन घेण्यात आले.दिपक भुसकुटे सरांनी उपस्थितांचे आभार मानले.