
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
सिरसी बु.:- कंधार तालुक्यातील सिरसी बु.पुनरर्वसन येथील खांबावरील पथदिवे नसल्यामुळे रात्रीला अवैध रित्या मुरुम खोदून चोरून नेत आहेत त्यामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत.त्या खड्ड्यांमुळे लहान मुले, वृद्ध व्यक्ती यांचे अपघात रोखण्यासाठी खांबावर बल्ब लावून देण्यात यावेत तसेच मुरूम चोरून नेणार्या चोरांचा बंदोबस्त करावा आणि पुनर्वसन झालेल्या प्लाॅटींगमध्ये सर्व बाजूंनी व मधील रस्ता सी.सी.रोड तयार करायची व नाली बांधकाम करून देण्यात यावे कारण सदरील पुनर्वसन सन १९८६ साली झाले असून शासनाने दिलेला पुनर्वसनासाठीचा निधी पुनर्वसनसाठीच वापर करावा असे व्यंकटी जाधव यांनी उपजिल्हाधिकारी साहेब नांदेड पुनर्वसन विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.तसेच संपुर्ण पुनर्वसन सिरसी बु येथील नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे.