
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
जि.प.प्रा.शा.शेलगाव( धा.)ता.लोहा जि. नांदेड शाळेमधून सन 2022मध्ये झालेल्या पुर्व माध्यमिक(5वी) शिष्यवृत्ती परीक्षेत उंच यशाची भरारी घेत 08 विद्यार्थी पात्र झाली आहेत. कु. मुळे धनश्री प्रभाकर, कु. वडजे सुप्रिया हरी, कु. भुजबळ लक्ष्मी छत्रपती, कु. नेरनाळे साक्षी दत्ता, भुजबळ साई उमाकांत, कु. टोणे सुमंतिनी महालिंग,कु.वडजे सृती ज्ञानेश्वर, कु. कदम शरयू ज्ञानेश्वर. सदर परीक्षेतील यशासाठी शाळेचे मु. अ. श्री मुलूखपाडे सी. एन. स. शि. श्री जाधव सर, श्री ढवळे सर, श्री अंबेकर सर, श्री मगर सर, सौ. पालमकर पी. पी. व सौ. मादसवार एस. ए. यांनी शालेय वेळे व्यतिरिक्त वेळेत सराव वर्ग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
या कार्यासाठी शेलगाव नगरीचे सरपंच व शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी मोलाचे सहकार्य केले.