
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा-: महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या तळयांपैकी एक शेलगाव (धा.), ता. लोहा येथे करण्यात येणार आहे. जलसंपदा विभागामार्फत मागील काही दिवसांपासून शेलगाव शेतशिवारात नियोजित तलावाचे सर्वेक्षण चालू आहे. संबंधितांना चौकशी केली असता उलट सुलट उत्तरे मिळतात, कधी गाव पाण्याखाली जाईल तर कधी मोठे धरण होईल असे सांगतात. यात वस्तुस्थिती मात्र अशी आहे की, शेलगाव हे ऊर्ध्व मानार ( लिंबोटी ) प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात असून या धरणाच्या पाण्याचा लाभ शेती सिंचनासाठी असताना या नियोजित सिंचन तलावाची गरज नाही व आमची शेती हे उपजीविकेचे साधन असल्याने आमच्या शिवारात सिंचन तलावास आम्हा गावकऱ्यांचा विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत हा तलाव आम्हा सर्वांना शाप ठरणार असल्याने तो आम्ही होऊ देणार नाही अशी भूमिका शेलगाव वासीयांना घेतली आहे. माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांच्या मार्गदर्शनाने जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना ३५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन यावेळी देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जीवनराव वडजे, रावसाहेब कदम, शिवराज गोरकट्टे, पवन वडजे, धोंडीबा गोरकट्टे, प्रशांत भुजबळ, रामेश्वर वडजे व गिरीश वडजे उपस्थित होते.