
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कलंबर खुर्द :- कंधार व लोहा तालुक्यातील महाराज,टाळकरी, मंडळी तसेच भाविक भक्तांना कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री.विठ्ठल रुक्मिणी संस्थान श्री क्षेत्र पंढरपूर येथील जगद्गुरु श्री.संत तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प.बापुसाहेब महाराज मोरे देहुकर ,ह.भ.प.मन्ना महाराज संस्थान शिंगणापूर,ह.भ.प.एकनाथ महाराज उम्रजकर हे महान संतमंडळी उपस्थित राहणार आहेत.तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यासाठी आपण दोन दिवस सेवा करण्यासाठी वेळ देऊन सहकार्य करावे.त्यासाठी दिनांक ३० नोव्हेंबर 2022 बुधवार रोजी कार्यक्रमाच्या नियोजन बैठकीचे आयोजन केले आहे.त्यामध्ये विविधकार्य करण्यासाठी समीती गठीत करण्यात येत आहेत.उदा.भोजन समिती, विचारपिठ समिती, स्वयंसेवक,वाडेकरी, पार्किंग व्यवस्था, सत्कार समिती, पाणी वाटप समिती, विद्यूत व्यवस्था, साफसफाई, मुख्य मंदिर व्यवस्था ई.समितीचे नियोजन करून देण्यात येणार आहे.तरी सर्वांनी या बैठकीस उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन ह.भ.प.निवृत्ती महाराज ईसादकर ,ह.भ.प.गयबी महाराज पानभोसीकर ,ह.भ.प.बापुराव महाराज सोनखेडकर ,ह.भ.प.संभाजी महाराज मडकीकर , गुरूवर्य डॉ.श्री.गोविंद नांदेडे साहेब,प्रा.बचाटे सर, प्राचार्य निवृत्ती कौंसल्यें यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न होणार आहे.टिप:- भक्तांनी येताना सोबत आपला पासपोर्ट फोटो घेवून यावा ओळखपत्र देण्यात येणार आहे.बैठकीचे स्थळ :- वैष्णवधाम श्री.संत निवृत्ती महाराज व श्री.संत मोतीराम महाराज संस्थान कलंबर खुर्द ता.लोहा जि.नांदेड.