
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
▪️ नगरपरिषदेने विकसित केली खाऊगल्ली,अतिक्रमण धारकांनी थाटली मटण चिकनची दुकाने
————————–————–
अमरावती :-सन २०१९ व २०२१ मध्ये अंजनगाव सुर्जी नगरपरिषदेने शहानूर नदी पात्रालगत खाऊगल्ली विकसित करण्यात आली.ही खाऊगल्ली होवू नये यासाठी स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न केले.या गल्लीमुळे आरोग्याचा तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता न.प.प्रशासनाला स्थानिक नागरिकांनी निवेदन दिले होते.स्थानिकांच्या विरोधानंतरही ही खाऊगल्ली येथे विकसित करण्यात आली आणि तीच खाऊगल्ली आता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली आहे.खाऊगल्ली लगत नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढले असून याकडे नगरपरिषद जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.त्याठिकाणी अतिक्रमण धारकांनी जनावरांचे गोठे तर मटण-चिकनची दुकाने तसेच वस्तू ठेवण्याची भंडारे थाटून ठेवली आहे.यावर न.प.प्रशासन सदर बाब गांभीर्याने घेणार काय?ह्याकडे समस्त अंजनगाव सुर्जी वासियांचे लक्ष वेधले आहे.तसेच तेथील अतिक्रमण हटविण्याची मागणी सुद्धा नागरिक करीत आहेत.