
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
चंद्रपूर
विसापूर २६ नोव्हेंबर म्हणजे भारतीय संविधान दिन ! संविधान म्हणजे धर्म, प्रांत,भाषा, आचार,विचार अश्या असंख्य तुकड्यांना देश नावाच्या सुंदर गोंधळीत विणणारा अमूल्य धागा म्हणजे आपले भारतीय संविधान! संविधान दिवस आज संपूर्ण देशात साजरा केला जातो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहीत संपूर्ण देशवासीयांना सन्मानाने जगण्याचा मूलमंत्र दिला. स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या आधारावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भारतीय बौद्ध महासभा विसापूर द्वारे भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष संजय वानखेडे यांच्या नेतृत्वात संविधान दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले व मिठाईचे वाटप करण्यात आले. आयोजित कार्यक्रमाला दिलदार जयकर, अरुण जगताप, अनंतसुग्रीव वानखेडे, स्वप्निल सोनटक्के, सिद्धांत पुणेकर, अविनाश वाघमारे,प्रथम दुपारे, सचिन पुणेकर, लोकचंद भोयर, गुंजन वानखेडे, सुरेश जीवने, विजय पाजारे, अमोल डोंगरे,कुणाल करमणकर, आकाश दुर्योधन व इतर पदाधिकारी व समस्त गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.