
दैनिक चालू वार्ता मराठवाडा उपसंपादक-ओंकार लव्हेकर
कंधार – मराठी पत्रकार परिषदेच्या 84 व्या वर्धापन दिना निमित्त शनिवार दि.3 डिसेंबर रोजी कंधार तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने, कंधार तालुक्यातील सर्वच पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात सर्व प्रकारची रक्त तपासणी, शुगर, बीपी तपासणी, एक्सरे, इ सी जी, दंत तपासणी तसेच उपचारा नंतर औषध देखील मोफत दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे कावीळ या रोगावारील लस देखील मोफत देण्यात येणार आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत कंधार येथे संपन्न होणाऱ्या या शिबिराचा सर्व पत्रकार बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन कंधार तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने करण्यात येत आहे.