
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कारेगाव:-येथील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्तेकर्ते अनिलदादा गायकवाड यांची रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माधवदादा जमदाडे यांनी रिपब्लिकन सेनेच्या मराठवाडा संघटक पदी अनिलदादा गायकवाड यांची निवड केल्याबद्दल सिडको नविन नांदेड येथील प्रबुध्द बुध्द विहार समितीच्या वतीने व प्रबुध्द महीला मंडळाच्या वतीने अनिलदादा गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोविंदसिंग ठाकुर हे होते तर प्रमुख पाहुणे सेवानिवृत्त मुख्याध्यापक नरसिंगराव दरबारे गुरुजी, राजाराम हटकर,विठ्ठल वाघमारे,रमेश सोनसळे,प्रविण ढाकणीकर,विशाल सोनसळे,भुजंग गजभारे,जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप मगरे यांची प्रमुख उपस्थीती होती. प्रथमता मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतीमेचे पुजन करुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक नरसिंगराव दरबारे गुरुजी यांनी केले तर आभार प्रविण ढाकणीकर यांनी मानले.