
दैनिक चालू वार्ता नरखेड प्रतिनीधी-
मारोती संपतराव कठाने असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचे नाव.
रविवारी रात्रीच्या सुमारास घडली घटना.
शेतकऱ्यांवर बँकेचे दोन लाख कर्ज असल्याची माहिती
नरखेड
नरखेड तालुक्यातील तारा येथील मारोती संपतराव कठाने वय वर्ष ६५ रा. तारा या शेतकऱ्याने घरीच गळफास घेऊन आत्महत्या केली. मारोती कठाने यांनी रविवारी रात्रीच्या सुमारास घरच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. गेल्या काही महिन्यांपासून ते अस्वस्थ होते. घरच्यांन सोबत ते फारसे बोलत नोव्हते नेहमी चिंतेत असायचे अशी माहिती त्यांच्या खरच्यानी दिली. त्यांच्यावर बँकेचे दोन लाख कर्ज असल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली रविवारी सकाळी 10 वाजता शेतातील काम करण्यासाठी शेतात गेले होते. व सायंकाळी घरी आल्यानंतर रविवारी रात्रीच्या सुमारास त्यांनी गळफास घेतला. घटनेची माहिती जलालखेडा पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचली व घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणी साठी शव विच्छेदन गृहात पाठवण्यात आला. असून पुढील तपास बीट जमादार मोरेशवर चलपे, दिनेश हिवशे करत आहे.