
दैनिक चालू वार्ता सातारा प्रतिनीधी- संभाजी गोसावी
सेगांव ता. खटाव येथील श्री. सेवागिरी महाराजांची वार्षिक यात्रा दि.१७ ते २७ डिसेंबर या कालावधीत संपन्न होणार असून महाराष्ट्रांतून तसेच शेजारील राज्यांतून आठ ते नऊ लाख जवळपास भाविक या कालावधीमध्ये पुसेगाव यात्रेमध्ये येत असतात. यात्रेचा मुख्य दिवस दि.२२ डिसेंबर असून या दिवशी श्री. सेवागिरी महाराजांचा वार्षिक रथ उत्सव होणार आहे. पुसेगाव येथे वाहनांची गर्दी होऊन वाहतूक व्यवस्थेत अडथळा निर्माण होऊ नये म्हणून वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपाचा बदल करण्यांत आल्यांची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख व कोरेगांव उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश केंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगांव पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे यांनी दिली. याच दरम्यान पुसेगावांतील व परिसरातील रस्त्यावरील वाहतुकीत दि.१७ ते दि.२७ डिसेंबर या कालावधी करता खालील प्रमाणे बदल करण्यांत आला आहे. व काही ठिकाणी प्रवेश व नो पार्किंग खालील प्रमाणे वडूज वरील राजवर्धन डाब्यापासून शिवाजी महाराज चौकाकडे जाण्याकरता राज्य परिवहन बससेवा वगळता इतर सर्व वाहनांना प्रवेश बंद राहणार आहे. तसेच वडूज रोडवरील सेवागिरी विद्यालयांकडे जाण्याकरिता सर्व वाहनांना प्रवेश करण्यांस बंदी घालण्यांत आली आहे. तसेच श्री. सेवागिरी मंदिरांपासून दोन्ही बाजूस २०० मीटर अंतरापर्यंत नों पार्किंग झोन आहे. दि.२१ रोजी रात्री १२ पासून दि.२५ रोजी मध्यरात्रीपर्यंत खालील प्रमाणे वाहतूक व्यवस्थेत तात्पुरता बदल केला गेला आहे. यामध्ये सातारा बाजूकडूंन दहिवडी बाजूकडे जाणारी सर्व वाहने पुसेगावांत न जाता नेर ,राजापूर कुळकजाई मार्गे दहिवडी कडे जातील. तर दहिवडी बाजूकडूंन येणारी सर्व वाहने कटगुण, खटाव खात गुण,जाखणगांव मार्गे औंध फाट्याकडे विसापूर मार्गे साताऱ्याकडे जातील. वडूज भागाकडूंन फलटणबाजूकडे जाणारी वाहने पुसेगावांत न येता खटाव ,जाखणगांव औंध फाटा नेर ललगुण मार्गे फलटणला जातील. तर फलटण बाजूकडूंन वडूज बाजूकडे जाणारी सर्व वाहने नेर, ललगुण, औंध फाटा,जाखणगांव,खटाव मार्गाने जातील दहिवडी ते डिंस्कळ जाणारी व येणारी वाहतूक निढळ, मलवडी राजापूरमार्गे जातील सदर वाहतुकीमध्ये जिल्हा पोलीस प्रशासनाकडूंन श्री. सेवागिरी यात्रेच्या पार्श्वभूमीवर बदल करण्यात आला आहे. तरी याची सर्व वाहनधारकांनी नोंद घ्यावी.