
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
विश्वरत्न भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन मुखेड येथील जिजाऊ ज्ञानमंदिर इंग्लिश स्कूलमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.
६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून परिपाठात बालसभेचे आयोजन करण्यात आले. सुजाता पांचाळ मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली इयता ६ वी च्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट परिपाठ सादर केला. बालसभेच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी अध्यक्ष सोमेश बापूसाहेब वडजे तर मुख्याध्यापक जगदीप जोगदंड , संस्थापक ज्ञानोबा जोगदंड यांची उपस्थिती होती. प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रेयस गिते या विद्यार्थ्याने केले . यावेळी श्रीनिवास गोपनर , शिवप्रसाद इंगोले , उज्ज्वल गायकवाड , कु .खुशी नागेश्वर , कार्तिकी गुजलवाड , रेवा गायकवाड , सोमेश वडजे या विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य या विषयी मनोगत व्यक्त केले. दरम्यान मुख्याध्यापक जगदीप जोगदंड यांनी भाषण केले. अध्यक्षीय भाषणात ज्ञानोबा जोगदंड यांनी ‘ मुलमंत्र आंबेडकरांचा ‘ ही स्वरचित कविता सादर केली. नक्षत्र पवार या विद्यार्थ्यांने बहारदार असे सुत्रसंचलन करून सर्वांचेच मन जिंकले. संकेत बर्मे याने सर्वांचे आभार मानले . सामुहिक संविधान घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सर्व शिक्षक , शिक्षिका , शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह बहुसंख्येनी विद्यार्थी उपस्थित होते.