
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
जी. प. माजी सभापती सुनील उरकुडे यांनी घटनास्थळ गाठून शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले
राजूरा
राजुरा तालुक्यापासून नजदीक भुरकुंडा खुर्द ग्रामपंचायत अंतर्गत सुकुडपल्ली येथील अंजनाबाई देवेंद्र सांड्रा यांच्या शेतातील धानाच्या ढीगाला अचानक आग लागून संपूर्ण वर्षाच्या मेहणीतीचे नुकसान झाले, तसेच त्यांचा मुलाचा संसार वेगळा असून बांध्याला बांध लागून असल्याने त्यांचे सुद्धा धानाचे ढीग भस्मसात झाले. संपूर्ण वर्षाची मेहनत तसेच लागवट खर्च धानाच्या ढिगाऱ्यात भस्मसात झाले.
या घटनेची माहिती भुरकुंडा खुर्द ग्रामपंचायत येथील नवनिर्वाचित उपसरपंच अजय राठोड यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहचून महसुली विभागाला माहिती देऊन पंचनामा करवून घेतला तसेच घटनेची गंभीरता बघून घटनेची माहिती जी. प. चे माजी सभापती तथा तालुकाध्यक्ष भाजप सुनील उरकुडे यांना दिली. तात्काळ माजी सभापती उरकुडे यांनी घटनास्थळी भेट दिली व घटनास्थळावरून शासकीय अधिकारी यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क करून नुकसानग्रस्त शेतकरी सांड्रा यांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
त्याप्रसंगी सोबत भाजपा चे दिपक झाडे, उपसरपंच भुरकुंडा अजय जी राठोड, पोलिस पाटील संजय रेगुंडवार, रत्नाकर पायपरे, नितीन पवाडे, सीद्धना अपलवार, भीमराव आत्राम व सुकुडपल्ली येथील नागरिक उपस्थित होते.