
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
सातारा जि. लोणंद पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये लोणंद पोलिसांनी रात्रगस्त घालत असताना फलटण तालुक्यांतील काळज येथून ९ डिसेंबर रोजी दोन वाजण्यांच्या सुमारांस अकरा लाखांच्या मुद्देमालासह चार आरोपींच्या लोणंद पोलिसांनी मुसक्या आवळल्या. यामध्ये पुढील प्रमाणेआरोपी ( कुणाल लोखंडे वय२४ रा.पिसोळी ता.हवेली जि.पुणे व अजित मस्के वय३२ रा.पिसोळी ता.हवेली जि. पुणे व राजकुमार सिंगा वय २० रा.फतेरिया उत्तराप्रदेश व राजेंद्रकुमार यादव वय १९ रा. उत्तर प्रदेश.) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत लोणंद पोलीस पोलिसांकडूंन मिळालेल्या माहितीवरुन फलटण ता. काळज गावच्या हद्दीमध्ये दि ९ डिसेंबर रोजी लोणंद पोलीस स्टेशनचे महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार मॅडम व पोलीस उपनिरीक्षक कयुम मुला यांच्यासह लोणंद पोलीस दि.९ डिसेंबर रोजी रात्री दोनच्या सुमारांस पेट्रोलिंग करीत असताना. काळज गावच्या हद्दीमध्ये बडे खान फाटयानजीक शिंगटे इंटरप्राइजेस येथील आय बी एम चे चार मोठे तुकडे दोन डंपर प्लेटा असा एकूण ३८ हजार ५०० किमतीचे साहित्य चोरुन घेवुन जात असताना लोणंद पोलिसांनी या चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडील चोरी साहित्य सुमारे दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात लोणंद पोलिसांना यश मिळाले. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर व फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित बरर्डे लोणंद पोलीस ठाण्यांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर व महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार मॅडम व पोलीस उपनिरीक्षक कयुम मुल्ला,महेश सपकाळ,केतन लाळगे यांच्यासह आदीं पोलीस कर्मचाऱ्यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला पुढील तपास नाळे करीत आहेत .