
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भू म:- शहरातील पेठेमधील श्री दत्त मंदीर येथे दुसऱ्या मजल्यावरील सभागृहाच्या बांधकामाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष संजय गाढवे व १०८ष.ब्र. विरुपाक्ष गुरुगिरी शिवाचार्य मानुरकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. येथील पेठेमधील श्री दत्त मंदिराच्या दुसऱ्या मजल्यावर सभागृह बांधण्याचे आश्वासन माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांनी दिले होते. राज्याचे आरोग्य मंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या सहकार्यातून माजी नगराध्यक्ष संजय गाढवे यांच्या प्रयत्नातून विशेष वैशिष्टपुर्ण योजनेतून निधी उपलब्ध करून श्री दत्त जयंतीचे औचित्य साधत श्रीदत्त मंदीराच्या सभागृहाच्या बांधकामाचा शुभारंभ विकासरत्न संजय गाढवे व १०८ ष.ब्र. विरूपाक्ष गुरुगिरी शिवाचार्य मानुरकर महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ. संयोगिताताई गाढवे, युवा नेते साहील गाढवे, अशोक तोडकर, शिवशंकर खोले, सिध्देश्र्वर मनगीरे, शिवाप्पा उंबरे, श्रीकांत नकाते, ओम स्वामी, अतुल स्वामी, धनंजय शेटे, नितीन होळकर ,समाधान खराडे यांच्यासह आदी समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.