दै.चालू वार्ता,
जव्हार,प्रतिनिधी,
दिपक काकरा.
जव्हार:- संपूर्ण देशात गौरवदिन म्हणून साजरा करण्यात येणारा १५ नोव्हेंबर हा दिवस क्रांतीसूर्य धरती आबा भगवान बिरसा मुंडा यांच्या १४६ वी जयंती जव्हार शहर आणि ग्रामीण भागातील खेडोपाड्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.तर जव्हार शहरात क्रांतिकारक चौक येथे सर्व आदिवासी समाज संघटने मार्फत कोब्रा कमांडो रामदास भोगाडे यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून उपस्थित सर्व आदिवासी संघटनान कडून विनम्र अभिवादन करण्यात आले.तसेच ग्रामीण खेडोपाड्यात मराड सर,युवा सामर्थ्य प्रतिष्ठान,केशव सृष्टी यांच्या सहकार्याने ग्रामीण युवकांनी पुढाकार घेऊन प्रथमच ग्रामीण भागात गौरवदिन म्हणून क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आल्याने तरुणाईने मोठ्या उत्साहात आपले पारंपारिक नृत्य असणाऱ्या तारपानाच वर ठेका धरून आनंद साजरा केला.ग्रामीण भागात हाडे,रामनगर,नांगरमोडा,कासटवाडी, चामिलपाडा,कऱ्हे,जयेश्वर अश्या अनेक खेडोपाड्यात साजरी करण्यात आली.तर जव्हार शहरात क्रांतिकारक चौक येथे पालघर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती गुलाबताई राऊत,जव्हार पं.स माजी सभापती ज्योतीताई भोये, पं.स सदस्य,युवा मराठी अभिनेते यशवंत तेलम,रवी बुधर,युवा आदिवासी संघटनेचे आजी-माजी पदाधिकारी,सर्व आदिवासी समाज संघटना व इतर सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Related Stories
14 hours ago
15 hours ago
15 hours ago