
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्यातील हणेगावात असणाऱ्या शाळा, महाविद्यालय परिसरात रोडरोमियोंची धुमाकूळ वाढत असल्याने विद्यार्थीना नाहक त्रासाला सामोरं जावं लागतं आहे. परिणामी शाळा भरताना व सुटताना पोलीसांनी गस्त घालण्याची मागणी राष्ट्रीय बंजारा परीषद विद्यार्थी आघाडी च्या वतीने मरखेल पोलीस निरीक्षकांना निवेदनातून केली आहे. सध्या शाळा महाविद्यालय परिसरात भरताना व सुटण्याच्या वेळेस टवाळखोर आपल्या मोटार सायकल वरुन घिरट्या घालतात ह्या रोड रोमियोंचा त्रास विद्यार्थीनीना होत असल्याने भविष्यात अनुचित प्रकार घडण्याचा नाकारून चालणार नसल्याने. या शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थीनीच्या सुरक्षते करिता टवाळखोर रोडरोमियोनां
कायद्याचा धडा शिकविण्याकरीता. शाळा, विद्यालय,होत असल्याने भविष्यात अनुचित प्रकार घडण्याचा नाकारून चालणार नसल्याने. या शाळकरी, महाविद्यालयीन विद्यार्थीनीच्या सुरक्षते करिता टवाळखोर रोडरोमियोनां कायद्याचा धडा शिकविण्याकरीता. शाळा, विद्यालय, महाविद्यालय, भरताना व सुटण्याच्या वेळेस विद्यालय समोर पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती करावी अशी मागणी, राष्ट्रीय बंजारा परीषद विद्यार्थी आघाडी च्या वतीने मरखेल पोलीस निरीक्षका गुट्टे यांच्या कडे निवेदनातून केली. यावेळी राष्ट्रीय बंजारा परीषद तालुका उपाध्यक्ष रितेश जाधव, किरण पवार, नेताजी राठोड, सचिन पवार, सुमित राठोड, विलास राठोड, सत्यम राठोड यांच्यासह आदी कार्यकर्तेची उपस्थिती होती.