
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मंनधरणे
देगलूर प्रतिनिधी; देगलूर शहरातील मच्छी मार्केटमध्ये विनापरवाना व बेकायदेशीर रित्या चालवित असलेले उघडयावरील मांस विक्रीचे दुकान बंद करणे व लोक वस्तीत व गुंडा महाराज मठ संस्थान मांस विक्री मधील होणारी अवैध व नियमबाहय बकरा तसेच कोंबडा कत्तल न करणे
नोटीसा द्वारे कळविण्यात येते की, आपणास नगरपरिषदेची कोणतीही रितसर परवानगी न घेता बेकायदेशीर रित्या सार्वजनिक रस्ता लगत तसेच देगलूर शहरातील रहदारीच्या रस्त्यालगत उघडयावर मांस विक्रीचे दुकाने लावून न.पा. आदेशाचे व शासन नियमाचे उल्लंघन करीत आहात.
आपण विनापरवाना व बेकायदेशीर रित्या उघडयावरील मांस विक्रीचे दुकाने लावून तसेच महाराष्ट्र प्रदुषन नियंत्रन मंडळ यांच्याकडून जनावरे कत्तलीसाठी ( कत्तलखाना ) नाहरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक असताना अवैध रित्या सार्वजनिक ठिकाणी व मठ जवळ नियमांचे पालन न करता न.पा. आदेशाची अमलबजावनी न करता मांस विक्री व अवैध जनावरांच्या कत्तलीमुळे नागरीकांच्या आरोग्य बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या प्रकारामुळे धार्मिक तणाव निर्माण होवून कोणताही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मांस विक्री व्यवसाय करीत असताना शासनाने वेळोवेळी दिलेल्या आदेशाची व नियमांची अमलबजावणी करणे आवश्यक आहे.
उघडयावरील मांस विक्री मुळे नागरिकांना व परिसरातील रहिवाशांना होत असलेल्या त्रासामुळे उघडयावरील मांस विक्री बंद करण्यासंबंधी अनेक तक्रारी या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. नागरिकांच्या तक्रारीची दखल घेवून व नागरिकांच्या
आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने सर्वसाधारण सभा क्र.२५ दिनांक ३०.०५.२०१२ अन्वये उघडयावरील मांस विक्रीचे दुकान बंद करण्यास मान्यता दिली आहे.
करीता आपणास या नोटीसी द्वारे आदेश देण्यात येते की, आपण ४८ तासाच्या आत आपआपली उघडयावरील मांस विक्रीचे दुकाने तात्काळ बंद करावीत व जनावराची कत्तल किंवा मांस विक्री मार्केट व लोकवस्तीत सार्वजनिक रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी करण्यात येवू नये. अन्यथा उघडयावरील मांस विक्री मुळे अथवा अवैध कत्तली मुळे कोणताही अनुचित प्रकार घडल्यास आपणास सर्वस्वी जबाबदार धरून आपल्या विरूद्ध महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायती औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ चे कलम (२६७ ते २६९) व महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९७६ कलम ६ (२) तसेच नागरी घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी नियम २०१६ अन्वये आपल्या विरूध्द कायदेशीर व दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल व उघडयावरील मांस विक्री दुकानातील मांस न.पा.तर्फे जप्त करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. असे नगरपालिकेने नोटीस मध्ये नमूद केले आहे.