
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:पोलिस आणि महसूल प्रशासनाच्या आशीर्वादाने देगलूर शहरासह तालुक्यात व बाहेरगावी वाळू आणि मुरुमाचे अवैध उत्खनन आणि वाहतूक सुरुच आहे. प्रशासनाच्या खाबुगिरीमुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे.
देगलर आणि बिलोली तालुक्यातील मांजरा नदीपात्रातील लाल वाळू विविध प्रकारच्या बांधकामासाठी आणि विशेषतः गिलावा करण्यासाठी उत्तम समजली जाते. त्यामुळेच काळ्या वाळूच्या तुलनेत लाल वाळूला प्राधान्य दिले जाते. गेल्या
वर्षापासून विशेषतः चाकरमानी मंडळी स्वतःचे घर असावे यासाठी प्लॉट खरेदी, घर खरेदी, घर बांधकामात अग्रेसर असलेले दिसून येत आहेत. त्यामुळे अन्य व्यवसायाच्या तुलनेत बांधकाम व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणात सुरु आहे. बांधकाम व्यवसायासाठी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा घटक म्हणजे वाळू होय. कायद्यानुसार वाळू उत्खनन आणि वाहतुकीस विशिष्ट कालावधीसाठीच परवानगी दिली जाते. त्यानंतर पुढील लिलाव होईपर्यंत वाळू उत्खनन आणि वाहतूक बंद ठेवण्याचा दंडक आहे; परंतु वाळूचा धंदा हा सध्यादेणारी कोंबडी’ झाल्यामुळे समाजातील पैसे असलेले सर्व घटक या व्यवसायात रस घेत आहेत. वाळूच्या व्यवसायातून पैसा कमावण्यासाठी अक्षरशः जीवघेणी स्पर्धा लागल्यामुळे पोलिस प्रशासन, महसूल प्रशासन, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, स्वयंघोषित संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील पदाधिकारी, कार्यकर्ते नदीपात्रा शेजारी असलेल्या गावातील नागरिक तसेच अन्य क्षेत्रातील असंख्य लाभार्थी मालामाल होत असल्याचे दिसून येत आहे. देगलूर तालुक्यातील तमलुर, शेवाळ-१, शेवाळा- २, शेळगाव, सांगवी उमर, मेदन कल्लूर आदी ठिकाणी वाळूघाटआहेत तर बिलोली तालुक्यात गळेगाव, बोळेगाव, माचनूर, हुनगुंदा, सगरोळी, राहेर आदी नदी पात्राशेजारील गावात वाळूघाट आहेत. नदीपात्रातील उपलब्ध असलेली वाळू, ती काढण्यासाठी लागणारा कालावधी आदींचा विचार करुन सर्वसामान्यपणे डिसेंबर महिन्यापर्यंत वाळू घाटांचा लिलाव जाहीर लिलाव केला जातो. सध्या यापैकी कोणत्याही वाळू घाटाचा लिलाव झाला नसला तरी तेलंगणातील बिरकुर आणि महाराष्ट्रातील सांगवी उमर येथील वाळू घाटावरून ट्रॅक्टर, बोलेरो पिकअपच्या व टिप्परच्या माध्यमातून वाळू वाहतूक केली जात आहे. तरी शासनाने लवकरात लवकर या विषयाकडे लक्ष घालून या वाळू वाफ यावर कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी ही देगलूर व देगलूर तालुक्यातील परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.