
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे उपनेते खासदार हेमंत भाऊ पाटील यांचा वाढदिवसानिमित्त लोहयात शिवसेनेचे तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार यांच्या पुढाकाराने विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ध्येय धोरणानुसार ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण या प्रमाणे शिवसेना तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार यांचे कार्य चालू असुन शिवसेना नेते राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे काम लोहा तालुक्यात चांगल्या रीतीने चालू असुन बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे उपनेते व कर्तव्यदक्ष खासदार हेमंत भाऊ पाटील यांचा आज दि. १६ डिसेंबर रोजी वाढदिवस होता त्यांचा वाढदिवस लोहयात शिवसेनेचे लोहा तालुकाप्रमुख मिलिंद पाटील पवार यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत विविध उपक्रमांनी साजरा केला.
यात जुना लोहा येथील जि.प. केंद्रीय ब्रँच शाळा येथील विद्यार्थ्यांना वह्या, पेना, दप्तर असे शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
तसेच लिंबोनी गल्ली लोहा येथील डॉ.हेलन केलर अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांना गोड , स्वादिष्ट व रुचकर जेवण वाटप आदी उपस्थित होते. करुन अन्नदान करण्यात आले.
यावेळी मकरंद पाटील पवार, संदिप पवार,अनिल पवार, दिनेश पवार, बालाजी वड, यांच्या सहित मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.