
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी: देगलूर तालुक्यातील हणेगाव बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरट्याने गर्दीचा फायदा घेत पर्समध्ये ठेवलेल्या ७५ ग्रॅम वजनाचे सोन्याच्या दागिन्याचे पर्स त्याची किंमत ०२ लाख ५९ हजार रुपये किमतीचे सोने लंपास केलेली आहे. हि घटना हणेगाव बसस्थानकावर घडल्यामुळे प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
येथील
देगलुर तालुक्यातील हणेगाव हे तीन राज्याच्या सीमेवर असल्याने या ठिकाणी मोठी बाजारपेठ, शाळा,महाविद्यालय, बँक, असल्याने परीसरातील जवळपास वीस ते पंचवीस खेड्यातील नागरिक व शाळेचे विद्यार्थी ये जा करण्यासाठी मोठी गर्दी दिसून येते, मात्र हणेगाव मरखेल मात्र पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांच्या दुर्लक्षपणामुळे हणेगाव बसस्थानक शेजारी देशी दारू दुकाने व अनेक अवैध धंद्यांना ऊत आल्याने दारूच्या आहारी जाऊन अनेकांच्या संसाराची राख रांगोळी झाल्यामुळे रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरांच्या प्रमाणात वाढ झाल्याने शाळकरी मुलींना तसेच प्रवासी महिलांना याचाआस सहन करावा लागत आहे. मागील काही दिवसापूर्वी बँक फोडणे, सोन्याचांदीचे दुकान फोडणे, इनामदार यांचे दुकान फोडणे असे अनेक प्रकार घडत असून हणेगाव बसस्थानकात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाल्याने हणेगाव बसस्थानक परिसरात पहिल्यांदाच एसटी बस मधून प्रवासी महिलेचे दागिने लंपास झाल्याची घटना पाहण्यास मिळाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अशोक बाजीराव पाटील व त्यांची पत्नी हे दोघे राहणार सोमुर तालुका देगलूर येथील रहिवासी असून त्यांनी हैद्राबाद जाण्यासाठी हणेगाव
आल्यानंतर एसटी बस मध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने पर्स मधील ७५ ग्रॅम वजनाचे अंदाजित किंमत ०२ लाख ५९ हजार रुपये किमतीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरल्याप्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची दखल घेत मरखेल पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी हणेगाव बसस्थानक परिसरात चोरट्यांचा शोध घेण्यात आला परंतु शोध घेण्यात अपयश आलं आहे. तरी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव मद्दे हे करीत.