
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- जिल्हा परिषदेमार्फत ८४१ ग्रामपंचायतींमध्ये ३१ जानेवारी २०२३ पर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वेळेत भरावा,यासाठी वसुली शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.गावकरी तसेच खातेदारांनी ग्रामपंचायतीचा मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वेळेत भरुन वसुलीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
जिल्हा परिषदेमार्फत ग्रामपंचायत स्तरावरील पाणी कर व मालमत्ता कर वसुली शिबिर विस्तार अधिकारी (पंचायत),विस्तार अधिकारी (कृषी) पथक प्रमुख तथा ग्रामपंचायत सचिव असे गट नेमून ८४१ ग्रामपंचायतींसाठी तारीखनिहाय कर वसुली शिबिराचे नियोजन करण्यात आले आहे.१००% कर वसूली होण्याच्या दृष्टीने वसुली शिबिर लावण्यात आले असून येथे मोठ्या प्रमाणात मालमत्ता कर व पाणीपट्टी कर वसुली सुर असल्याचे जिल्हा परिषदेमार्फत कळविण्यात आले आहे.